मंडणगड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे व इतर शहरांतून मोठ्या संख्येने गणेश भक्त गावाकडे येणार असल्याने मंडणगड तालुक्यातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेलचा पुरेसा व नियमित साठा उपलब्ध ठेवावा, तसेच रात्रीच्या वेळेत आवश्यकतेनुसार पेट्रोल पंपांची सेवा सुरू ठेवावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या संदर्भात युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य चेतन सातोपे यांनी 8 सप्टेंबर 2026 रोजी तहसिल कार्यालायत दिलेल्या निवेदनातील माहीतीनुसार गणेशोत्सव काळात इंधनाची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने तुटवडा निर्माण होऊ नये तसेच रात्रीच्या प्रवासात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व पेट्रोल पंप चालकांची तातडीने बैठक घेऊन योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली.
यावेळी युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य चेतन सातोपे, युवासेना तालुका समन्वयक अझहर मुकदम,उपतालुकाधिकारी राकेश गायकवाड सचिव प्रतिक पोतनीस, शहर सचिव योगेश जंगम, उपविभाग अधिकारी रुपेशजी धनावडे, सल्लागार निलेशजी महाडिक, वसीम चिपोळकर, दयानंद राठोड, आदी उपस्थित होते.
