मंडणगड : महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार श्री. योगेश कदम यांच्या विशेष प्रयत्न व शिफारशीने मंडणगड तालुक्यातील आणखी आठ गावांसाठी नवीन विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) मंजूर करण्यात आले आहेत. १०सप्टेंबर ०२६ रोजी धुत्रोली येथे विद्युत रोहीत्राचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले. याचबरोबर तालुक्यातील नायणे, शिगवणकोंड, नारगोली पूर्ववाडी, मंडणगड तुरेवाडी, बाणकोट, बाणकोट जिल्हा परिषद शाळा, मंडणगड बोरीचा माळ आणि वेरळ तर्फे वेसवी या गावांचा यामध्ये समावेश आहे.

नवीन विद्युत रोहित्र मंजूर झाल्यामुळे संबंधित गावांतील वीजपुरवठ्याच्या समस्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या कामासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल शिवसेना तालुका प्रमुख मंडणगड तथा रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर यांनी नामदार योगेश कदम यांचे आभार मानले आहेत.