चिपळूण : कोकण रेल्वे मध्ये 30 पदांसाठी ऑफिस बॉय, खलाशी, हेल्पर, ही भरती प्रक्रिया सुरू आहे. व याच्या मुलाखती रत्नागिरी मुख्य कार्यालयामध्ये घेतले जात आहेत. ही भरती ओपन अर्ज मागून मुलाखती घेतल्या जात आहेत. यामध्ये कोकणाच्या बाहेरील परप्रांतीय मुलाखती देण्यासाठी आले असल्याचे समजते.
वरील 30 जागांच्या भरतीसाठी सुमारे 600 ते 700 अर्ज आले आहेत व याच्या मुलाखती रत्नागिरी कोकण रेल्वेचे मुख्य कार्यालयामध्ये घेतल्या जात आहेत. सदर भरतीवर कोकण अन्याय निवारण समिती ने आक्षेप घेतला आहे. रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्याच्या व्यतिरिक्त बाहेरील कामदार आम्ही घेऊ देणार नाही. असे पत्र कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत भाई मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहे.
दहावी पास असणाऱ्या लोकांसाठी वरील भरती चालू आहे.
वरील पदासाठी कामगार कोकणामध्ये उपलब्ध असताना बाहेरील लोकांच्या मुलाखती घेण्याची आवश्यकता काय? असा प्रश्न मुकादम यांनी उपस्थित केला आहे व सदरील भरतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत व बाहेरील परप्रांतीय आम्ही कोकण रेल्वे मध्ये घेऊ देणार नाही. इतर प्रांतामध्ये रेल्वेची भरती असते तेव्हा कोकणातील बेरोजगारांना संधी दिली जात नाही असेही मुकादम यांनी म्हटले आहे.