आबलोली : गणपती बाप्पाच्या आगमना नंतर भक्तांच्या आनंदाला उधान आले असून बाप्पाच्या आरतीमधे आणि नाच – गाण्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच तल्लीन झाले आहेत. गुहागर तालुक्यातील खोडदे गावातील झरे वाडी येथे उद्योजक श्री. गजानन साळवी, सचिन साळवी, संदेश साळवी यांच्या निवासस्थानी बाप्पाचे आगमन झाल्यानंतर बाप्पाचे धुमधडाक्यात जंगी स्वागत करण्यात आले असून बाप्पाच्या सेवे खातर गुहागर तालुक्यातील चिंद्रावळे गावातील मायभूमी कलामंच चिंद्रावळे डाफळेवाडी(तुरेवाले ) या नाच मंडळाचा नाच लय भारी आणि जल्लोषात सादर झाला. बाप्पाची भक्ती गीते, राधा कृष्णाची गीते आणि भक्ती संगीताने भक्तांच्या आनंदाला उधाण आले होते. तुरेवाले शाहीर तुषार घुमे सह सुरेश घुमे यांनी सुमधुर आवाजात गाणी गायली ही गाणी राकेश डाफळे यांनी लिहिली होती. या गाण्यांना यतीन डाफळे यांनी ढोलकीने तर संदीप डाफळे यांनी ऑर्गोन ने संगीत दिले तर सुनिल घुमे, संजय डाफळे, नंदकुमार डाफळे, संतोष डाफळे आदींनी उत्तम साथ दिली. ग्रामीण भागातील
कलाकारांच्या अंगातील कला पाहून सुमधुर गाणी ऐकून आणि तितकाच सुंदर नाच पाहून बाप्पांच्या भक्तगनांचे समाधान झाले. सर्वांनी बाप्पाचे दर्शन घेऊन बाप्पांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर उद्योजक गजानन साळवी यांच्या कुटुंबियांनी येणाऱ्या सर्व भक्तांचे तितकेच आदराने स्वागत करुन बाप्पाच्या आरतीने आणि प्रसादाने मायभूमी कलामंच चिंद्रावळे डाफळेवाडी या तुरेवाले नाच मंडळच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.त्यानंतर उपस्थित सर्वांना गजानन साळवी यांच्या कुटुंबियांच्या वतीने चहा, नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. एकंदरीत बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण गाव मंगलमय झाले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी खोडदे पंचक्रोशीतील जनता बहुसंख्येने उपस्थित होती.