चिपळूण : श्री गणेश क्रीडा मंडळ, पेठमाप-गणेशवाडीच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर मंडळाचे आधारस्तंभ कै. दीपक दत्तात्रय निंबरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.यावेळी चिपळूण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री. रत्नाकर पवार, गणेश मित्र मंडळाचे सल्लागार श्री. नरेश काळे,प्रकाश जाडे काशिराम पवार,प्रा. रुपेश धाडवे, विजय आग्रे, राजेश गोवळकर, पराग निंबरे, जयंत जाडे, गणेश पवार अशोक जड्याळआदी मान्यवर उपस्थित होते.मंडळाला नेहमीच सहकार्य करणारे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सिव्हिल इंजिनिअर श्री. अमोल चव्हाण यांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
मंडळाचे सदस्य श्री परिमल शिर्के यांनी अल्प उपहारची व्यवस्था केली प्रा. रुपेश धाडवे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर पवार यांनी मंडळाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच गावात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेश बाळ गोविंदा पथकाने चिपळूण बाजारपेठेत मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व तरुण कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत पवार यांनी केले.
