रत्नागिरी : जिजाउ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संस्थापक निलेश सांबरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेची सेवा करण्यासाठी मोफत रुग्णालय सुरु केले, रूग्णांना खुप चांगले उपचार केले जात आहेत, पण सदर रुग्णालयाबाहेर रिक्षा स्टाँप करुन रिक्षाव्यवसायिक येणार्या जाणार्या प्रवाशांना मीटरप्रमाणे भाडे न आकारता डायरेक्ट भाडे सांगुन लूट करण्याचे प्रकार सुरू आहेत.
एखाद्या प्रवाशाने याबाबत विचारणा केली असता,मीटरप्रमाणे भाडे घ्या असे सांगितले तर दमात रिक्षाचालक दमात उत्तर देतात, हे दर चार वर्षांपुर्वीचे आहेत, आमचे दर बरोबर आहेत.
जर संपूर्ण रत्नागिरी शहरात मीटर प्रमाणे प्रवाशांकडून दर आकारले जात असताना भगवान महादेव सांबरे रुग्णालयाबाहेरील रिक्षा चालक आपल्या मनाप्रमाणे भाडे आकारत आहेत त्यामुळे आरटीओ कार्यालयाकडून गंभीर दखल घेऊन सदर रिक्षा थांबा जवळील रिक्षा चालक – व्यवसायिक यांना मीटर प्रमाणे भाडे आकारण्यासाठी प्रवृत्त करावे अशी जनतेची मागणी आहे.