रत्नागिरी : तालुक्यात वाटद पंचक्रोशीत ऋतु कोणताही असो विजेचा लपंडाव नेहमीच सुरू असतो घरोघरी गणरायाचे आगमन झाले आहे सणासुदीच्या दिवसात सुध्दा विजेचा लपंडाव सुरू असुन महावितरण विभागाबाबत जनतेत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
वाटद पंचक्रोशीत सतत वीज ये-जा असा प्रकार सुरू असल्याने नागरिकांकडून सतत पाठपुरावा करुन सुध्दा वाटाण्याच्या अक्षता दिल्या जात आहेत, महावितरण च्या कार्यकारी अभियंता यांनी या संदर्भात गंभीर दखल घेऊन वीजपुरवठा नियमित सुरळीत करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी जनतेची आहे.