मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी जोरदार पलटवार केला आहे. “राहुल गांधींना काय बनायचं आहे, हे त्यांनी ठरवलं आहे. त्यांची भूमिका महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून जगभरात माहिती आहे,” असं भाई जगताप यांनी म्हटलंय.

तसंच, “छप्पन्न इंचाची छाती आणि छप्पन्न टक्के वसुली, हाच आता महाराष्ट्राचा लौकिक राहिला आहे,” असा गंभीर आरोप करत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. “छप्पन्न इंचाच्या छातीने देशाचा सत्यानाश केला असून, हे आता लोकांनी उखडून टाकावं,” असंही भाई जगताप म्हणाले.