नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत आयोगातीलच सदस्यांनी आक्षेप नोंदवल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर, या संविधानिक संस्थेच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होणे ही चिंताजनक बाब आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,आमच्यावर अन्याय झाला असेल, उद्धवजींवर अन्याय झाला असेल, तर त्याकडे एक राजकीय खेळी म्हणून ही बाब बाजूला ठेवू. पण सर्वसामान्य मायबाप जनतेला संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारबाबत जर निवडणूक आयोगाकडून गल्लत होत असेल, तर ही बाब अतिशय चिंताजनक आहे,राज्यातील दुष्काळावर भाष्य करताना मंत्री बांधावर जात आहेत, याचे स्वागतच आहे ,मात्र शेतकऱ्यांना ठोस मदत मिळाली पाहिजे, असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,संविधानाला केंद्रबिंदू ठेवून आपल्याला सार्थ अभिमान आहे की, या देशात आज नाही तर उद्या मला न्याय मिळेल. पण हीच संविधानिक यंत्रणा जर कोलमडणार असेल, तर मग सामान्य माणसाने विश्वास कोणावर ठेवायचा?,कुठल्याही भारतीयाला आपल्या संविधानाचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या भाषांचा सार्थ अभिमान आहे. या संविधानावर विश्वास ठेवूनच हा देश चालला आहे. अशा परिस्थितीत एखाद्या संविधानिक संस्थेच्या पक्षपाती भूमिकेबद्दल जर जनता बोलत असेल, हे वेदनादायी आहे,असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे.
पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाले की,दुष्काळ हा अतिशय संवेदनशील विषय असतो. त्यामुळे मला त्याच्यात राजकारण आणायचं नाहीये. उलट, उशिरा का होईना पण माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे मंत्री बांधावर जाणार आहेत याचं मी स्वागत करते. पण माझी एवढीच सरकारला विनंती आहे की, यातून काहीतरी ठोस शेतकऱ्याच्या पदरात पडलं पाहिजे,पंचनामे तातडीने झालेच पाहिजेत. दुष्काळाच्या वेळी कुठलंही राजकारण न करता, आपण सगळ्यांनी मिळून तातडीने महाराष्ट्रातल्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे,निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत जर देशामध्ये गडबड असल्याचं आम्ही एकटेच म्हणत नसू, तर प्रशासनात आणि आयोगात काम केलेली लोकंही जर असं म्हणत असतील, तर ही किती चिंताजनक बाब आहे! हे गांभीर्याने घेतलं पाहिजे, असे सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले आहे.