खेड : तालुक्यातील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित ज्ञानदीप इंग्लिश मिडिअम स्कूल, मोरवंडे-बोरज येथील प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत प्रशालेच्या अंडर-19 मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्यपदक (Silver Medal) पटकावले. तसेच अंडर-17 मुलांच्या संघाने कांस्यपदक (Bronze Medal) मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. अंडर 19 संघात आदित्य खापरे, सार्थक शिगवन सक्षम संसारे, हर्ष चाळके, प्रेमांशू शिंदे, अवधूत महाडिक, ऋग्वेद मोरे, आर्यन पाटील यांनी तर अंडर 19 संघात हर्षिल धाडवे, ऋग्वेद जोंधळे, प्रशिक कदम, संस्कार घाडगे, तनुष नगरकर, श्रवण मोहिते, आयुष काटकर, अरहान मुल्लाजी, राज वागले, दक्ष थोटे,श्रवण देवळेकर तसेच 19 वर्षातील गटामध्ये प्रणव किंजळे व सार्थक शिगवण आणि 17 वर्षातील आतील गटामध्ये हर्षिल धाडवे आणि आयुष काटकर या चार विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभागीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक श्री आशिष देशमाने आणि हर्षदा पार्टे यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, प्रशालाचे प्राचार्य श्री भरत मोरे सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.