खेड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व रत्नागिरी जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजी जिल्हा क्रीडा संकुल रत्नागिरी येथे घेण्यात आलेल्या नेटबॉल स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहोळा खेड मधील ज्ञानदीप विद्या संकुल भडगावच्या खेळाडूंनी 14 वर्षे 17 वर्ष व 19 वर्षे वयोगटामधील मुला-मुलींतील खेळाडू तथा विद्यार्थ्यांच्या हस्ते पार पडला.
सलग तेरा वर्षे विजेतेपद मिळवल्याबद्दल ज्ञानदीप विद्या संकुल भडगावचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक श्री संतोष भोसले यांचा सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय शिंदे व नेटबॉल संघटनेच्या अध्यक्ष झोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्ञानदीपच्या तीन राष्ट्रीय खेळाडू कु. आर्ना रुपम पाटणे, कु.मुक्ता शीतल पेठे,कु. अनुष्का नरेश शिंदे यांच्या हस्ते नेटबॉल स्पर्धेचे उदघाट्न करण्यात आले कु. आर्ना रुपम पाटणे हिच्या हस्ते श्रीफळ वाढवून जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेचे उदघाट्न करण्यात आले.
फोटो
रत्नागिरी येथील जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेचा श्रीफळ वाढवून उद्घाटन करताना ज्ञानदीप विद्यामंदिर भडगावची विद्यार्थ्यांनी तथा नेटबॉलपट्टु कु. अर्थात रुपम पाटणे दिसत आहे.