खेड :- शहरातील समर्थनगर भागात सैन्य दलातील सेवेत असलेले सैनिक, माजी सैनिकांसाठी, वीर माता- पिता, वीरपत्नि, विधवा पत्नि आणि सैनिकांच्या अवलंबित्व पाल्यांना शैक्षणिक सुविधा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सन 1946 मध्ये शहराच्या मध्यवर्ती अशा समर्थनगर येथील भागात सैनिकी मुलांचे वसतीगृह व सैनिक विश्रामगृह बांधण्यात आले होते. मात्र कालांतराने दोन्ही इमारती जर्जर आणि मोडकळीस आल्या होत्या. या दोन्ही इमारतींचे पुनर्बांधणी होणे आवश्यक आहे. जेणेकरून तालुक्यातील माजी सैनिकांना, वीरमाता आणि विधवा मातांसाठी तसेच सैनिकांसाठी सुसज्ज आणि भव्यदिव्य सैनिक संकुल उभारण्यात यावे. अशी मागणी आजी माजी सैनिक संघटनांनी जेष्ट शिवसेना नेते, माजी मंत्री रामदासभाई कदम व गृहराज्य मंत्री ना योगेशदादा कदम यांचे केली आहे.
या मागणीची दखल घेत मंत्री महोदयांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग खेडचे अभियंता निलेश पावशे यांनी प्रत्यक्षात घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी खेडचे नगरसेवक श्री निकेतन पाटणे, नगरसेविका सौ. रसिका खेडेकर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक सुनिल कदम, आजी माजी सैनिक संघटना खेडचे अध्यक्ष सुभेदार, मेजर डि.डि. आखाडे, उपाध्यक्ष काशीराम सकपाळ, सचिव निलेश मोरे, खजिनदार निकम, आणि दौलत चव्हाण, दिलीप भोसले (तिसंगी), जंगम, मोरे (ऐनवली), खेडेकर (खेड), जाधव (धवडे), यांचेसह संघटनेचे पदाधिकारी तसेच सैनिक संघटना शिवतरचे अध्यक्ष शिवाजी मोरे, सूर्यकांत मोरे, बळीराम मोरे आदि उपस्थित होते.