मंडणगड : देव्हारे येथे संपन्न झालेल्या तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत डॉ.बी.ए.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने हॉलीबॉल आणि कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.या देदीप्यमान यशामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.विद्यार्थ्यांनी विविध वयोगटांत मिळवलेले यश खालीलप्रमाणे:हॉलीबॉल स्पर्धा:१४ वर्षे वयोगट (मुले व मुली): प्रथम क्रमांक,१७ वर्षे वयोगट (मुले): द्वितीय क्रमांक कबड्डी स्पर्धा:१४ वर्षे वयोगट (मुली): प्रथम क्रमांक,१७ वर्षे वयोगट(मुले) प्रथम,१९वर्षे वयोगट (मुले): प्रथम क्रमांक,१९ वर्षे वयोगट (मुली): तृतीय क्रमांक या दैदिप्यमान कामगिरीबद्दल तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक संजय अवेरे व गौतम माने यांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी विजेत्या खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले.तसेच पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
तालुका क्रीडा स्पर्धेत डॉ.आंबेडकर हायस्कूलचे हॉलीबॉल व कबड्डीत घवघवीत यश…
