चिपळूण – पक्षात ना कुणी पाठीराखा उरला ना कुणी वाली त्यामुळे एकमेव आश्वासक नेतृत्व असलेल्या माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अलोरे खेर्डी पोफळी येथील उबाठा पक्षातील महिला कार्यकर्त्यांनी माजी सभापती धनश्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
नुकत्याच झालेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाने खचून न जाता धनश्री शिंदे यांनी पक्ष संघटनेच्या कामाला नव्या जोमाने सुरूवात केली आहे.-आपल्या अलोरे खेर्डी या गटातील महिलांच्या भेटी घेऊन त्यांनी आपल्या उबाठा पक्षातील सर्व महिला सहकाऱ्यांना शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचाच भाग म्हणून आज माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या कार्यालयात हा पक्ष प्रवेश घेण्यात आला. यावेळी शिवानी कासार – युवती तालुका अधिकारी चिपळूण, रेश्मा चव्हाण – उपतालुका अधिकारी ( अलोरे गट) सुकन्या पेढांबकर – उप तालुका अधिकारी ( पोफळी गट), पल्लवी चव्हाण – विभाग प्रमुख ( खेर्डी ) स्मिता राजवीर – सरपंच ( पिंपळी बुद्रुक), विनया झुजम – सदस्या, सिद्धी कदम – सदस्या, सरस्वती झुजम – सदस्या, सिद्धी महाजन – सदस्या, जयश्री सकपाळ – दादर शाखा प्रमुख, शामल घरत – कान्हे माजी सरपंच, अभिषेक प्रसाद, रिपब्लिकन सेना (आनंदराज आंबेडकर) या सर्वांनी सदानंद चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून थेट शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जुने नवे असा कोणताही भेद न करता सर्वांना सन्मानाची वागणूक मिळेल असा विश्वास श्री.चव्हाण यांनी यावेळी प्रवेशकर्त्याना दिला.या प्रवेशासाठी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार श्री. सदानंद चव्हाण, महिला आघाडी जिल्हा संघटक रश्मीताई गोखले, तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य संदेशबापू आयरे, तालुकाप्रमुख रुपेश घाग, ता.समनव्यक दिलीप चव्हाण, महिला आघाडी तालुकाप्रमुख सुप्रिया सुर्वे, माजी सभापती धनश्री शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख तथा चिपळूण न.प.चे पाणी पुरवठा समिती सभापती निहार कोवळे, महिला आघाडी शहर प्रमुख प्राजक्ता टकले, शिवसेना उपतालुकाप्रमुख सिद्धार्थ कदम, युवासेना शहरप्रमुख विनोद पिल्ले, युवतीसेना शहरप्रमुख शिवानी शिंदे, विभागप्रमुख राजू गुजर, महेश डिघे, प्रकाश पाथरूड, महिला आघाडी विभागप्रमुख रीना परमार आदी उपस्थित होते. या प्रवेशामुळे शिवसेनेची महिला आघाडी आणखी मजबूत झाली आहे. लवकरच वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे आणखी मोठे पक्षप्रवेश शिवसेनेत होतील अशी माहिती शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी या पक्ष प्रवेशानंतर बोलताना दिली.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY