खेड :- तालुक्यातील व मुळ राहणार खोपी येथील 23 वर्षीय सतिश बाळाजी गोरे याची अज्ञात आरोपीने अपहरण केल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 325/2026 मध्ये भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 140(अ) अन्वये येथील पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गुन्हा सोमवार दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 09.00 वाजताच्या सुमारास घडला असुन, हा गुन्हा सोमवार दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 09.00 वाजताच्या सुमारास घडला असुन, गुन्ह्याची फिर्याद अपहरणकर्तेचे वडिल श्री. बाबु बाळाजी गोरे वय 40, रा. रसवंतीगृह, खोपीफाटा ता खेड जि रत्नागिरी यांनी येथील पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
खेड पोलीस ठाण्यातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुळ रा. खोपी, ता खेड जि. रत्नागिरी येथील फिर्यादीत यांचा 23 वर्षीय तरुण तथा मुलगा सतिश बाळाजी गोरे हा सध्या रा. घाणेखुंट ता खेड जि. रत्नागिरी हा कामानिमित्त लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रात कामाला असून तो सोमवार दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 09.00 वाजताच्या सुमारास खोपी ता खेड जि रत्नागिरी येथील घरी येण्यासाठी हिरो कंपनीची डिलक्स दुचाकी क्रमांक एमएच 08 BB 0592 या दुचाकीवरून खोपी फाटा, ता खेड जि रत्नागिरीत येथे येण्यास निघाला असताना, तो घरी आला नाही, म्हणून मुलाला मोबाईल फोन वरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असताना, मोबाईल फोन का उचलत नाही म्हणून प्रत्यक्षात फिर्यादीत वडिल लोटे परशुराम येथील औद्योगिक क्षेत्रात येऊन अपहरण झालेला मुलगा कामावर आला कि नाही, याची खातरजमा करायला आले असताना दोन/चार दिवस कामालाच आलाच नाही. तर दुचाकीवरून यायला निघाला तो घरी आलाच नाही, म्हणून फिर्यादीत वडिल हे समक्ष येवुन खातरजमा करून घेत, अपहरणकर्ते सतिश बाळाजी गोरे हा लोटे येथे कामानिमित्ताने घाणेखुंट ता खेड जि रत्नागिरी येथे वास्तव्यास असुन सोमवार दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 09.00 वाजताच आपल्या दुचाकीने खोपी फाटा, ता खेड जि. रत्नागिरी येथे आलाच नाही, म्हणून येथील पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून घेत, अज्ञात इसमाविरोधात येथील पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.