खेड :- येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचालित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) व कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालेतील विद्यार्थी झेद जावेद परदेसी, अब्दुल मुईज मोहसीन कौचाली, आर्यन महेंद्र दिवेकर, देवेश मंगेश राऊत, आसीम झमीर चौगुले या विद्यार्थ्यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व रत्नागिरी जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 11/9/2026 रोजी खेड येथे घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केले.
या सर्व खेळाडूंची पुढे होणाऱ्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून, सुरज संतोष वरक याने सिल्व्हर मेडल तर हर्ष वैभव जाधव याने ब्राँझ मेडल प्राप्त केले आहे. या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे त्यांच्या पालकांचे, पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक संतोष भोसले यांचे संस्था व प्रशालेतर्फे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
