खेड : तालुक्यातील बिजघर गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी सौ. राजेश्री राजेंद्रराव भोसले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
ग्रामसभेमध्ये एकमताने निवड झाल्याबद्दल तसेच सर्व ग्रामस्थांनी प्रथमच या पदासाठी महिला म्हणून निवड करून पहिला बहुमान दिल्याबद्दल विजय माळ त्यांच्या गळ्यात पडल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. कार्यकारीणीत तंटामुक्ती सदस्य म्हणून गावातील ग्रामस्थ यांची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन करण्यात आले आहे. तंटामुक्ती अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारिणीचे मराठा स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.