मुंबई – राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी बांधवांना मदत मिळावी, या उद्देशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजारांचा धनादेश आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याकडे सुपुर्द केला.

संकटाच्या काळात शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेणे ही कौतुकास्पद बाब आहे. दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध व्हावी, यासाठी शासनासोबतच समाजातील विविध घटकांनीही पुढे येणे गरजेचे आहे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या श्रीकांत शिंदे यांच्या उपक्रमाचे सुनेत्रा पवार यांनी कौतुक केले.