खोपोली: सेवा संकल्प अभियान 2026 अंतर्गत खोपोली नगर परिषदेच्या वतीने आज महाराजा मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराच उद्घाटन केले, यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम साबळे मुख्याधिकारी पंकज पाटील, आरोग्य विभागाचे गौतम भगळे, बांधकाम सभापती अनिल सानप, नगरसेविका व महिला आघाडीच्या अश्विनी अत्रे, नगरसेविका सानिया शेख, रुकसाना जळगावकर, भाजप शहराध्यक्ष अजय इंगुलकर, सरचिटणीस विनायक माडपे, युवा मोर्चा अध्यक्ष डॉ निकेत पाटील, भाजप कार्यकर्ते संजय करंजकर, विभा फाटक, विमल गुप्ते, निर्मला रजपूत, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष मोहसिन शेख, शहर उपाध्यक्ष कृष्णा पाटील, व अनेक भाजप कार्यकर्ते त्याप्रमाणे नगरपालिका कार्यालयातील अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे नगरपरिषद रुग्णालयातील डॉक्टर डॉक्टर रिया गायकवाड, नर्स व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.