रत्नागिरी : महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे पोर्टल १७ सप्टेंबरपासून सुरू झाले असून, १ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वर तालुक्यांमधून एकूण ८,८९३ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार, चिपळूण तालुक्यातील १४७ गावांमधून ४,५८४ अर्ज, गुहागर तालुक्यातील १०२ गावांमधून २,१७२ अर्ज, तर संगमेश्वर तालुक्यातील १२६ गावांमधून २,१३७ अर्ज प्राप्त झाले आहेत. अशा प्रकारे तीन तालुक्यांतील एकूण ३७५ गावांचा या उपक्रमात सहभाग असून, आतापर्यंत ८,८९३ महिलांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत.
सर्वाधिक अर्ज करणारी चार गावे
या आकडेवारीत संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे गाव आघाडीवर असून, येथून सर्वाधिक ५१० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानंतर चिपळूण तालुक्यातील मुंढे गावातून २९९, खडपोली गावातून २२३, तर गुहागर तालुक्यातील अडूर गावातून २१० अर्ज दाखल झाले आहेत.