खोपोली(जयवंत माडपे) : भारतीय जनता पार्टी खोपोली शहराच्या वतीने खोपोली शहरातील अमरधाम स्मशानभूमीत सेवा संकल्प पंधरवडा निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानाचे उद्घाटन उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. व त्यांनी सहभाग घेतला,यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात 25 वर्षे पूर्ण होत आहे या निमित्ताने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर आज स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगितले. सर्व शहरभर अशा स्वरूपाचे कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे पण त्यांनी सांगितले.
यावेळी शहर अध्यक्ष अजय इंगुलकर सरचिटणीस विनायक माडपे, विकास नाईक, भाजप अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष मोहसिन शेख, मितेश शहा, नगरसेविका व महिला आघाडी प्रमुख अश्विनी अत्रे, साठे, राजन शेटे युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ निकेत पाटील याचबरोबर इतर प्रमुख कार्यकर्ते यांनी या अभियानात भाग घेतला