दापोली :- आपल्या देदिप्यमान वाटचालीद्वारे प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर उंचावत ठेवीत असलेल्या दापोली अर्बन को-ऑप. बँक लि., दापोली या बँकेची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी नवभारत छात्रालय, सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृह दापोली येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
या सभेकरीता बँकेचे १२५० भागधारक सभासद उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला अहवाल सालामध्ये मृत पावलेले राजकीय व सामाजिक नेते, शहीद झालेले भारतीय जवान, बँकेचे माजी अध्यक्ष तसेच बँकेचे सभासद, ग्राहक व हितचिंतक यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर विषयवार कामकाजाला सुरुवात करण्यापुर्वी बँकेच्या भागधारक सभासदांपैकी ज्या सभासदांनी विशेष नांवलौकीक मिळविला आहे अशा सभासदांचा दापोली अर्बन बँकेचे संचालक मंडळ व सर्व भागधारक सभासदांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
बँकेचे भागधारक सभासद डॉ. संदिप राजपुरे यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाल्याबद्दल व श्री. सुधीर कालेकर आणि श्री. प्रितमजी रुके यांना समाजरत्न व समाजभुषण हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.