कल्याण मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टीचा जाहीर मेळावा पार पडला
या मेळाव्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते.
आठवले यांनी कल्याण डोंबिवली मध्ये जागावाटप आणि महायुती फूट पडली तर भाजप सोबतच राहणार असल्याची भूमिका या ठिकाणी मांडली असून
जागा वाटपासाठी तिन्ही पक्षाचे किती एकमत होतं हे माहिती नाही ,मात्र आमचा पक्ष भाजपचा मित्र त्यामुळे भाजपने आम्हाला आपल्या कोट्यातून जागा द्याव्या तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी 20 जागांसाठी देखील मागणी केलेली आहे आणि याबाबत रवींद्र चव्हाण यांच्या सोबत चर्चा करणार असून
भाजपने पुढाकार घेऊन तिन्ही पक्षासह आम्हाला सोबत घेऊन कल्याण डोंबिवलीत महानगरपालिकेवर महापौर महायुतीचा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा
भाजप शिवसेनेचा वाद वाढत असला तरी निवडणूक आल्यावर तो वाद कमी होणार …आत्ता एकत्र झाले नाही मात्र निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र येऊन महापौर महायुतीचा होणार असल्याचं याठिकाणी रामदास आठवले यांनी सांगितल आहे .