चिपळूण : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी चिपळूणमध्ये बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीतर्फे प्रांतधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
आमदार भास्करशेठ जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी पेठमाप येथे श्री. इम्तियाज मुकदम यांच्या निवासस्थानी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला महिला जिल्हाध्यक्षा दीपिका कोतवडेकर, तालुकाध्यक्ष अविनाश केळसकर, शहराध्यक्ष समीर देसाई यांच्यासह ज्येष्ठ नेते शिरीष काटकर, सतीश खेडेकर आदी उपस्थित होते. समाजातील सर्व घटकांनी या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
