मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र कमिटीच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघ २०२६ निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार आज जाहीर करण्यात आले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
जाहीर करण्यात आलेले उमेदवार
१. मंगेश छत्रपती वानखेडे – नागपूर पदवीधर मतदारसंघ
२. प्रा. सोमनाथ जनार्दन साळुंखे – पुणे पदवीधर मतदारसंघ
३. डॉ. आय.सी. शेख – पुणे शिक्षक मतदारसंघ
४. गाजी जाहोरेश – अमरावती शिक्षक मतदारसंघ
वंचित बहुजन आघाडीने शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांना प्रभावीपणे विधान परिषदेत मांडण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांसाठी ठामपणे आवाज उठविण्यासाठी हे उमेदवार मैदानात उतरवले आहेत.
शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न, पदवीधरांच्या रोजगाराच्या संधी, शैक्षणिक क्षेत्रातील पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर प्रभावी भूमिका मांडण्याचा पक्षाचा निर्धार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी एकजुटीने काम करावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.