खेड : – तालुक्यातील तिसंगी केंद्राची शिक्षण परिषद तिसंगी नं. १ शाळेत उत्साहात संपन्न झाली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी संदीप घाणेकर होते, तर हेदली केंद्राचे केंद्रप्रमुख सदाशिव राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक संजय जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी मूल्यवर्धन उपक्रम, मूल्यक्षमता व अध्ययन निष्पत्ती, नवीन शैक्षणिक वर्षातील मूल्यवर्धनाची सहा लक्ष्ये तसेच मूल्यवर्धन उपक्रमांच्या प्रात्यक्षिकांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक माहिती देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संजय जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र मिरजकर, अंगणवाडी सेविका प्रणिता भोसले आणि निकिता पडेल यांनी मेहनत घेतली.
तिसंगी नं. १ शाळेत मूल्यवर्धन उपक्रम, मूल्यक्षमता आणि अध्ययन निष्पत्तीवर मार्गदर्शन!
