रत्नागिरी : – मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (S.I.R) कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ क्र. २६६ निहाय समन्वयक म्हणून दि. ०२ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा. जयद्रथ खताते यांची नेमणूक केली आहे…..
त्या अनुषंगाने आज रविवार दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विशेष बैठक प्रदेश समन्वयक जयद्रथ खताते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
?या पहिल्याच बैठकीला पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्तम उपस्थिती राहिली. यावेळी श्री. जयद्रथ खताते यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पक्षांतर्गत काम करत असताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. कार्यकर्त्यांच्या अडचणी व म्हणणे पक्षाच्या प्रदेश कार्यालयात माझ्या मार्फत मांडले जाईल, असे आश्वासन खताते यांनी यावेळी दिले.
?तसेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (S.I.R) कार्यक्रमासंदर्भात मतदार संघातील बूथ निहाय सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक बूथवर मतदार यादी अचूक असावी, दुबार नावे वगळणे आणि नवीन मतदारांची नोंदणी याबाबत नियोजन करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष बंटी वनजू, ज्येष्ठ नेते बशीरभाई मुर्तुजा, युवक पदाधिकारी मौसीन काझी, नारायण खोराटे, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष सचिन साडविलकर, खेर्डीचे माजी सरपंच रवींद्र फाळके आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
