चिपळूण : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चिपळूण नगरपरिषद आणि चिपळूणवासीयांच्या वतीने रविवार, 11 ऑक्टोबर रोजी शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार, नाट्यकर्मी, कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शोकसभेत नाना पाटेकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. आमदार भास्कर जाधव, संतोष केतकर, शौकत मुकादम, मंदार ओक, समीर जानवरकर, नगरसेवक शशिकांत मोदी, फैसल कासकर, साजिद सरगुरोह, पत्रकार सतीश कदम, विद्याधर निमकर, मोहन मिरगल, शशिकांत मोदी, शिरीष काटकर, किशोर रेडीज, फैसल कासकर, प्रशांत यादव आणि नगराध्यक्ष उमेश सकपाळ आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी वक्त्यांनी नाना पाटेकर यांचे चिपळूणसह संपूर्ण कोकणाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि त्यांनी केलेल्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. चिपळूणला पूरमुक्त करण्याच्या प्रयत्नांमध्ये नाना पाटेकर यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. विशेषतः वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार आणि या कामासाठी केलेले प्रयत्न चिपळूणकर कधीही विसरू शकणार नाहीत, अशी भावना वक्त्यांनी व्यक्त केली.
चिपळूणच्या पूरप्रश्नाबाबत नाना पाटेकर यांनी विशेष लक्ष दिले होते. वाशिष्ठीतील गाळ काढण्याच्या कामासाठी त्यांनी केलेले सहकार्य आणि शहराप्रती दाखवलेली आपुलकी यामुळे चिपळूणकरांच्या मनात त्यांच्याविषयी कायम कृतज्ञतेची भावना राहील, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. नाना पाटेकर यांच्या सामाजिक कार्याची आणि चिपळूणसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण ठेवत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.