चिपळूण: कोकण नागरी संघर्ष समिती महिला आघाडीतर्फे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात लोटे एमआयडीसी येथील कंपनीकडून होत असलेल्या पी-फास घातक रसायन बंदीच्या मागणीसाठी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

प्रदूषण मंडळाच्या अधिकारी सोनाली मालुसरे यांनी निवेदन स्वीकारले.या निवेदनामध्ये म्हटले आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये घातक रसाचे उत्पादन बंद झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.

निवेदन देताना महिला आघाडी प्रमुख सौ नेहा नितीन धुमाळ, श्रीमती रंजीता ओतारी, सौ स्मिताताई खंदारे, सौ अंजली चव्हाण, सौ तृप्ती सुधीर कदम, श्रीमती स्वाती मिलिंद भोजने, दीपिका कोथवडेकर,सौ देवयानी अविनाश हरदरे,नीलम वाडकर, सौ संगीता भरत लोटे, सौ अनिता मारुती पवार या प्रमुख महिलांनी निवेदन सादर करून कंपनीचा जाहीर निषेध केला.

कोकण नागरी संघर्ष समिती महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही या घातक रसायनाच्या विरोधात गावागावात जाऊन जनजागृती करू आणि व्यापक स्वरूपात आंदोलन कसे यशस्वी होईल त्या दृष्टीने प्रयत्न करू. कोणत्याही परिस्थितीत कंपनीमध्ये घातक रसायनाची निर्मिती होणार नाही त्यासाठीच आमचे आंदोलन आहे आणि ते यशस्वी होईल असा विश्वास या महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻 

  🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻

https://sagarwave.com

🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻 

https://chat.whatsapp.com/GLUI6https://chat.whatsapp.com/GLUI6mjYZfeARsSectAexY