लांजा : मंडळाच्या स्थापनेपासूनच अत्यंत सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अमोल मेस्त्री यांच्याकडे आता समाजाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. अमोल मेस्त्री यांचा तालुक्यातील तळागाळातील समाज बांधवांशी अतिशय दांडगा व थेट संपर्क आहे. एक साधा, सुस्वभावी आणि मनमिळावू कार्यकर्ता म्हणून त्यांची समाजात ओळख आहे. मात्र, समाजाच्या हितासाठी आणि अन्यायाविरुद्ध प्रसंगी आक्रमक भूमिका घेणारे नेतृत्व म्हणूनही ते परिचित आहेत. समाजातील अनेक गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे, गरीब कुटुंबांना हक्काचा रोजगार मिळवून देणे यासाठी त्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन समाजाने त्यांची मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल लांजा तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांचे या अभिनंदन होत आहे. या निवडीप्रसंगी मंडळाचे कार्याध्यक्ष संतोष दत्ताराम पांचाळ, उपाध्यक्ष रमाकांत मेस्त्री, सचिव रामदास पांचाळ, सह सचिव विजय पांचाळ, खजिनदार संतोष पांचाळ, माजी अध्यक्ष मंगेश मेस्त्री, संतोष सुतार वेरवली, सुशांत मेस्त्री, विघ्नेश मेस्त्री, नारायण पांचाळ, संतोष पांचाळ, ललित पांचाळ, राकेश पांचाळ, अतेश पांचाळ, रसिका मेस्त्री, वेदिक पांचाळ, विनायक पांचाळ, रुपेश पांचाळ, रामचंद्र पांचाळ आदी समाज बांधब उपस्थित होते.
