खेड : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., च्या शाखा खेडचे अनिकेत शॉपिंग सेंटर, स्वर्गीय मिनाताई ठाकरे सभागृह शेजारी, खेड येथून मुकादम रॉयल आर्केड, तीनबत्ती नाका खेड येथील स्वमालकीच्या नूतन वास्तूमध्ये नुकतेच स्थलांतर झाले.
हा स्थलांतर उद्घाटन सोहळा बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते व बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.या स्थलांतर उद्घाटन सोहळ्याचे वेळी बँकेचे सर्व संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधिर प्र. गिम्हवणेकर, बँकेचे सरव्यवस्थापक श्री. समीर र. दळवी, सर्व कर्मचारी वृंद व ग्राहक उपस्थित होते. सदरील नूतन वास्तूचे फर्निचर, इलेक्ट्रीकल वर्क मे. राज कंस्ट्रक्शन रत्नागिरी व आर्किटेक्टर इंटीरिअर डिझाईन वर्क मे. विश्व आर्किटेक्ट, रत्नागिरी यांनी केले. या सोहळ्याचे औचित्य साधून बँकेच्या शाखा खेड मार्फत वाहन कर्जाचे वितरण करण्यात आलेल्या काही ग्राहकांना बँकेच्या मान्यवरांच्या हस्ते वाहनांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित ग्राहक व इतर नागरीक यांनी बँकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.