चिपळूण : भाजप तालुका कृषी सचीव श्री प्रविण कांबळी यांच्या कापसाळ येथील “भारती फूडस ” या काजू फॅक्टरीला नगरसेविका अंजली कदम यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक नऊ च्या महिलांनी भेट दिली .
चिपळूण तालुक्यातील सर्व शेतकर्यां साठी आदर्श असा हा प्रकल्प सर्वांनी भेट द्यावा असा आहे . अत्याधुनिक मशिनचा वापर करून चांगल्या प्रतिची काजू बी इथे प्रक्रिया करून पॅकिंगसहित विक्री साठी उपलब्ध होते . बारमाही काम असणार्या या फॅक्टरीच्या माध्यमांतून अनेक महिला तसेच पुरुषांना रोजगार मिळाला आहे . फॅक्टरीच्या आजूबाजूला काजू झाडे , आंबा कलमे यांची लागवड केली आहे . ज्यांना खरोखर कोणताही स्वयंरोजगाराचा प्रकल्प उभा करावयाचा आहे त्यांनी इथे भेट द्यावी . अजूनही अनेक नवनविन प्रयोग इथे सुरू आहेत जेणेकरून कोकणातले वातावरण , इथे पिकणारी फळे यांचा वापर करून रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल याचा अभ्यास सुरू आहे . कोकणातील शेतकर्यांनी शेतकर्यांसाठी असणार्या शासकीय योजनांचा फायदा घेत विविध प्रकल्प उभे केले पाहिजेत यासाठी प्रविण कांबळी हे आग्रही असतात . सातत्याने त्यासाठी ते प्रयत्न करत असतात .
महिलांनी सुध्दा विविध शासकीय योजनांचा आधार घेत फळ प्रक्रिया , भाज्यांवरील प्रक्रिया , प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ यांचे प्रकल्प उभे करावेत त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत , मार्गदर्शन यासाठी प्रविण कांबळी तयार आहेत .
फॅक्टरीला भेट दिल्यावर सर्व महिलांनी कोणतातरी प्रकल्प आपणही सुरु करू अशी इच्छा व्यक्त केली . यावेळी महिलांना मोलाचे मार्गदर्शन लाभले .
सर्व महिलांनी श्री कांबळी यांचे आभार मानले . यावेळी श्री कांबळी यांनी नगरसेविका अंजली कदम यांचा सन्मान केला . उपस्थितांचे आभार मानले . यावेळी
नगरसेविका अंजली कदम , भाजप पदाधिकारी रुही खेडेकर , धीरज खेडेकर, माधुरी शिंदे , पूजा कदम ,अरुता आडविलकर , रुचिता बंगाल, ऋतुजा मोरे , सोनाली भालेकर , श्री आडविलकर ,
संजीवनी घाटकर, शितल निकम , शुभांगी कदम , संजीवनी सनगरे व इतर उपस्थित होते .