चिपळूण : चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पोटनिवडणुकीत महिला संचालकपदी सौ. सारिका श्रीनाथ खेडेकर, तर संचालकपदी श्री. मोहन दाभोळकर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल बँकेचे चेअरमन मोहनशेठ मिरघल, व्हाईस चेअरमन धनंजयशेठ खातू आणि अन्य संचालकांनी त्यांचे अभिनंदन केले.
या वेळी संचालक निहारशेठ गुढेकर, प्रशांत शिरगांवकर, रत्नदीप देवळेकर, समीर जानवलकर, मिलिंदशेठ कापडी, समीरशेठ टाकळे, सुनील खेडेकर, अविनाश केळस्कर, रहीमानभाई दलवाई, महिला संचालिका सौ. गौरीताई रेळेकर, श्रीमती संपदा रेडीज यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
