मंडणगड : महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागामार्फत राज्यातील सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी सन २०२६ ते २०२८ या कालावधीकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या सनदी लेखापरीक्षकांच्या नाम तालिकेत मंडणगड येथील कु. भाग्यश्री विजय खैरे यांचा समावेश झाला आहे. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील नामतालिका प्रसिद्ध करण्यात आली.
सहकार विभागाच्या या नामतालिकेत निवड होणे ही कु. भाग्यश्री खैरे यांच्यासाठी महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे. या निवडीमुळे त्यांना राज्यातील सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणाच्या क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
कु. भाग्यश्री विजय खैरे यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
कु. भाग्यश्री विजय खैरे यांची सहकार विभागाच्या सनदी लेखापरीक्षक नाम तालिकेत निवड..
