देवरुख : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करणारे मनोज जारंगे पाटील यांनी आँडीओ क्लिपच्या आधारे केलेल्या ‘५०० कोटी’च्या तथाकथित आरोपाचा संगमेश्वर शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद पवार आणि युवासेना उपतालुका प्रमुख सुधीर चाळके यांनी जरांगेंचा तीव्र शब्दांत निषेध करत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली पत्रकारांशी बोलताना केली.
“मराठा समाजाच्या नावावर राजकारण करून स्वतःच्या खळग्याभरत मराठा समाजाची दिशाभूल करणाऱ्या अशा ढोंगी नेत्यांना कोकणातील मराठा समाज भुलणार नाही. खोटेनाटे आरोप करणाऱ्यांना शिवसेना स्टाईल ने जशास तसे उत्तर देईल,” असा इशारा त्यांनी प्रमोद पवार यांनी बोलताना दिला.
मराठा समाजाच्या भावना दुखावणारी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत. जारंगे पाटील यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा, अशी मागणी करून तालुका प्रमुख पवार यांनी या क्लिप प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी पत्रकारांशी बोलताना केली.