मिरजोळी : मिरजोळी येथे रविवारी सांयकाळी 5:00 वाजता पुस्तक प्रकाशन व लेखक गौरव सोहळा संपन्न होणार आहे .त्याचप्रमाणे स्तनाचा कर्करोग जनजागृती अभियानाचा भव्य शुभारंभ होणार आहे .तरी या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक ,सामाजिक कार्यकर्ते अजमल दलवाई यांनी केले आहे .
प्रख्यात कर्करोग तज्ञ डॉ .वसीम फोपलुनकर व श्री शकुर तिसेकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या आणि वाचक ,अभ्यासक आणि रुग्ण यांच्या पसंतीस उतरलेल्या , BREAST CANSER :YOUR QUESTIONS OUR ANSWERS या पुस्तकाचे मराठी भाषांतर मिरजोळी येथील लेखक रफिक रहिमान दलवाई यांनी केले आहे .मिरजोळी येथील उदयोन्मुख लेखिका व सध्या दुबई येथे वास्तव्यास असणाऱ्या आलिया दलवाई यांच्या लेखणीतून साकारलेल्या READY,SET, INTERVIEW व THE GRADUATE TRANSITIONया दोन पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी होणार आहे .साहित्य प्रांतात दलवाई परिवारातील लेखकांच्या योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .पुस्तक प्रकाशनासोबत सर्व लेखकांचा गौरव ही यानिमित्ताने केला जाणार आहे .
त्याचबरोबर डॉ .वसीम फोपलुनकर आणि शकुर तिसेकर यांच्या संकल्पनेतून स्तनाचा कर्करोग जनजागृती अभियान पुढील काळात राबविले जाणार आहे .स्तनाचा कर्करोग जनजागृती अभियानाचा शुभारंभ यावेळी होणार आहे .स्तनाच्या कर्करोगासंबंधी मार्गदर्शन पर चर्चासत्र यावेळी संपन्न होणार आहे .
चिपळुणातील प्रसिद्ध सर्जन डॉ .रत्नाकर घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला आमदार भास्करशेठ जाधव ,आमदार शेखरजी निकम ,डॉ .अद्वैत गोरे ,माजी आमदार रमेशभाई कदम ,माजी आमदार सदानंदजी चव्हाण ,नगराध्यक्ष उमेशजी सकपाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .तर डॉ .इसहाक खतिब ,उपनगराध्यक्ष डॉ .प्रा .रुपाली दांडेकर ,डॉ .श्रुतिका कोतकुंडे ,डॉ .अब्बास जबले ,डॉ .शरिफा मुकादम ,डॉ .फैसल दलवाई यांची उपस्थिती लाभणार आहे .
तरी नेशनल इंग्लीश मीडियम स्कूल मिरजोळी येथे रविवार 25 ऑक्टोबर 2026 रोजी सांयकाळी 4:30 वाजता सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन रफिक दलवाई व कार्यक्रमाचे संयोजक अजमल दलवाई यांनी केले आहे .
मिरजोळी येथे पुस्तक प्रकाशन ,लेखक सन्मान सोहळा; स्तनाचा कर्करोग जनजागृती अभियानाचा शुभारंभ…!
