जळगाव:- रायगड जिल्ह्यातील भीमाशंकर येथील वृक्षतोडीचे प्रकरण राज्यात प्रचंड तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ ही भाजपची जुनीच खोड आहे. भीमाशंकरच्या निमित्ताने हा कार्यक्रम जोरात सुरू केलेला दिसत आहे असं त्या म्हणाल्या आहेत.
पुढे त्या म्हणाल्या की, भीमाशंकर येथे केलेल्या वृक्षतोडीसाठी सामान्य जनतेने सत्ताधाऱ्यांच्या चांगलीच कानशिलात भडकावली आहे. चूक मान्य करेल ते सत्ताधारी कसले ? म्हणून आपण जे केले ते बरोबर आहे हे सांगण्याची चढाओढ सुरू झाली आहे. नकली भुवयावाली बाई तर सर्वात पुढे असते पण यंदा राधाकृष्ण विखे पाटील, मेघना बोर्डीकर आणि इतर प्रमुख मंडळींनी यात सहभाग नोंदवला आहे अशी टीका त्यांनी केली आहे.
भाजपने कितीही आदळआपट केली तरी झाडाला पवित्र मानून पुजा अर्चा करणाऱ्या आपल्या भारतात वृक्षतोडीचे समर्थन करणाऱ्या ‘पापी’ जमातीला लोक झाडखाऊच म्हणतील! असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
