मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशाचा राष्ट्रध्वज हातात घेऊन मोठ्या संख्येने फुले-शाहू-आंबेडकरवादी नागरिक आणि मतदार ‘ज्ञानेश कुमार हटाव मार्च’मध्ये सहभागी झाले आहेत.

निवडणुकीतील गैरकारभाराच्या विरोधात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवावे, तसेच देशातील लोकशाही आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेचे संरक्षण करावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा मार्च काढण्यात आला आहे.