चिपळूण – गुहागर रोड, बाजारपेठ, चिपळूण येथील श्री साईधाम मित्र मंडळाचा २९ वा वर्धापन दिन आज शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. मंडळाचे स्थापना वर्ष १९९७ असून, वर्धापन दिनानिमित्त दिवसभर पूजा-अर्चा, आरती, हरिपाठ, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता श्रींच्या षोडशोपचार पूजेने होईल. सकाळी ८.३० वाजता श्री सत्यनारायणाची पूजा, दुपारी १२.३० वाजता उत्सवानिमित्त श्रींची मध्यान्ह आरती आणि दुपारी १२.४५ ते २.३० या वेळेत महाप्रसाद (भंडारा) होणार आहे.
सायंकाळी ६ वाजता कालुस्ते येथील मधली वाडीतील लक्ष्मी नारायण भजन मंडळाचा हरिपाठ, सायंकाळी ७ वाजता श्रींची धूपारती आणि ७.३० वाजता लक्ष्मी नारायण भजन मंडळाचे भजन होईल. रात्री ९ वाजता श्री उदयानंदगिरी ॐ स्वामी विद्यानंदगिरी सेवा यांचे भजन आयोजित करण्यात आले आहे.
वर्धापन दिनाचे विशेष आकर्षण म्हणून रात्री १० वाजता रत्नागिरी येथील श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये लंकाधिपती दशानन रावणाच्या कथेसह भगवान शिवशंकरांच्या आत्मलिंगाची कथा सादर केली जाणार आहे.
या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याला भाविकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री साईधाम मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.