माणगाव : तालुक्यामध्ये रविवार दिनांक 1 नोव्हेंबर हा घातवार ठरला असून दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पुणे वरून माणगावच्या दिशेने येत असताना ताम्हिणी घाटात दुचाकीचा अपघात होऊन पूजा मनोज गोरे वय 27 वर्ष हिचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवर दुसरी असलेली व्यक्ती मंजीत संजय शर्मा वय 32 वर्ष हे जखमी झाले आहेत.
दुसरी घटना वडवली येथे घडली असून कचरा फेकायला जात असताना कैसर जुल्फिकार येलूकर वय 40 वर्ष यांना टेम्पो ने उडवल्याने अपघातात त्यांच्या मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन महिलांचा मृत्यू झाल्याने माणगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.