दापोलीः- रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित, हिरवळ प्रतिष्ठान आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन सभागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर आमदार प्रमोद जठार, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, मृद जलसंधार विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय साहुले, जिल्हा कृषि अधिकारी शिवकुमार सदाफुले, तहसिलदार राजाराम म्हात्रे, डॉ. श्रीधर ठाकुरदेसाई, दादा दळी आदी उपस्थिती होते. संजय वैशंपायन यांनी सूत्रसंचालन केले. नंदू तांबे यांनी प्रास्ताविक केले.
दापोलीतील जलतज्ञ डॉ. प्रशांत परांजपे म्हणाले की, अतिथींना पूर्ण ग्लासाऐवजी अर्धा ग्लास पाणी देणे आणि हॉटेल किंवा घरात पिण्याचे पाणी सिंकमध्ये ओतून न देता काटकसरीने वापरण्याची सवय प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे. आगामी उन्हाळ्यात पर्यटन व देनंदिन जीवन सुरळीत ठेवायचे असेल तर महाविद्यालयीन युवकांनी पुढे येऊन जलदूत व जलयोध्दे म्हणून काम करावे. राज्यातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला तात्काळ बंदी घालावी, तसेच बहुमजली इमारतींमधील सांडपाणी आणि एसीतून वाया जाणारे पाणी साठवून त्याचा पुनर्वापर करावा. प्रत्येक बहुमजली इमारतीत फ्लश टँकचे व सांडपाणी संकलित करून, त्यावर प्रक्रिया करून स्वतंत्र पाईपलाईनव्दारे टेरेसवरील टाकीत साठवून त्यांचा वापर करावा. एका वेळेस फ्लशसाठी 5 लिटर पाणी लागते. एका रात्री एका एसी तून 5 ते 8 लीटरपाणी बाहेर पडते ते साठवून झाडांना वापरावे.
जलतज्ञ डॉ. उमेश मुंडल्ये यांनी सांगितले की, गावागावांतील सांडपाणी ओढे आणि नाल्यांमध्ये सोडल्यामुळे पिण्याच्या विहिरींचे पाणी दूषित होत आहे. यावर उपाय म्हणून रत्नागिरी शहरातील फणशी येथे 2019 फ्लोटिंग रिडबेड सिस्टीम च्या माध्यमातून बॅक्टेरियल कल्चर आणि वनस्पतींचा वापर करून सांडपाण्यावर यशस्वी प्रक्रिया करण्यात आली होती. परंतु असे प्रकल्प नंतर व्हायला हवे होते. रोजच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करता येईल. समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा विचार मांडला जातो. यासाठी इस्त्रालयचे उदाहरण दिले जाते. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे खूच खर्चिक आहे. त्यामुळे या दृष्टीने विचार करण्याऐवजी, टप्प्याटप्याने पावसाचे पाणी अडवून भुजलपातळी वाढवण्याचा विचार करावा, अशी सूचना डॉ. मुडले यांनी केली.
डॉ. चंद्रशेखर निमकर म्हणाले की, निवेंडी येथील माझ्या घरी सांडपाण्याचा पुनर्वापर केला जातो. हे सर्वांना शक्य आहे. प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून आता पुढील सात महिने पाणी वाचवूया आणि पुढील पावसाळ्यात पाणी अडवूया. त्याव्दारे भूजल पातळी वाढेल आणि पाण्याचा ताळेबंद राखता येईल. परंतु यासाठी शासन व लोकांच्या सहभाग आवश्यक आहे.
जिल्ह्यात शेकडो जलदूत आणि जलप्रेमी दररोज ऑनलाईन बैठका घेऊन प्रत्यक्ष फील्डवर जलसंधारणाचे काम करत आहेत. मात्र दुदzवाने, पंचायत समिती आणि प्रशासनाच्या टंचाई आढावा बैठकांमध्ये किंवा आराखडे तयार करताना या कार्यकर्त्यांना निमंत्रित केले जात नाही. केवळ टँक मागवण्यापेक्षा टँकरमुक्त व जलयुक्त गाव संकल्पना राबविण्यासाठी या अनुभवती जलसेवकांचा प्रशासनाने तातडीने सहभाग करून घ्यावा, अशी मागणी चिपळूणचे शहानवाज शहा यांनी केली.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांना पाणी वाचवा विषयावरील अतिशय प्रभावी पथनाटय सादर करून वाहवा मिळविली. या विद्यार्थ्यांना प्रा. सचिन सनगरे, डॉ. चित्रा गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले.