चिपळूण : राज्याचे कृषिमंत्री मा. श्री. दत्तामामा भरणे यांच्याकडे कृषी विभागातील कंत्राटी पद्धतीने दिली जाणारी तसेच दुष्काळी भागातील कंत्राटी कामे राज्यातील बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्थांना उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी चिपळूण-संगमेश्वरचे आमदार श्री. शेखर निकम यांनी पत्राद्वारे केली आहे. राज्य बेरोजगार सहकारी संस्था संघ, मुंबईचे संचालक श्री. सचिन कोल्हापुरे यांनी हे पत्र आमदार शेखर निकम यांना दिले.
या वेळी आमदार श्री. शेखर निकम, रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्री. अजित यशवंतराव तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण शहराध्यक्ष श्री. मिलिंदशेठ कापडी उपस्थित होते.
लवकरच यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून संबंधित संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.
