चिपळूण – पांग बौद्धवाडीसमोर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, बौद्धवाडी व परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठा वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग उभारण्याची अत्यंत गरज असल्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन राष्ट्रीय महामार्गाचे सचिव संतोषजी शेलार (सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य, कोकण भवन, नवी मुंबई) यांना देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजुभाई जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, सरचिटणीस उमेश सकपाळ, डॉ. अशोक सकपाळ, चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती, शाखा क्रमांक १ चे अध्यक्ष प्रभाकरजी सकपाळ आणि सरचिटणीस सिद्धार्थ परशुराम जाधव उपस्थित होते.
हे निवेदन तातडीने संबंधित खात्याचे मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या दिल्लीतील कार्यालयात पाठविण्याचे आश्वासन सचिव संतोष शेलार यांनी दिले.
