सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग आणि मुंबईदरम्यानचा प्रवास आता अधिक जलद आणि सुखकर होणार आहे. नवी मुंबई ते सिंधुदुर्गातील चिपी विमानतळादरम्यान बहुप्रतीक्षित विमानसेवा आजपासून सुरू झाली आहे. फ्लाय ९१ या विमान कंपनीच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्यात आली असून, नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण केलेल्या पहिल्या विमानाचे चिपी विमानतळावर यशस्वी लँडिंग झाले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी नवी मुंबई विमानतळावर या विमानाला हिरवा कंदील दाखवला. विशेष म्हणजे, आठवड्याचे सातही दिवस ही विमानसेवा सुरू राहणार आहे. चिपी विमानतळावर पहिल्या विमानाच्या स्वागतासाठी आमदार नीलेश राणे यांच्यासह शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या विमानसेवेमुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच मुंबई आणि सिंधुदुर्गदरम्यानचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- लांजा तालुक्यात जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांमध्ये हाणामारी; परस्परविरोधी तक्रारी, तिघे जखमी…
- क्रीडा संकुलांचा अखर्चित निधी आवश्यकता असलेल्या संकुलांना पुनर्वितरित करावा;मंत्रिमंडळ मान्यतेचे प्रस्ताव तात्काळ सादर करा…
- महाविकास आघाडीच्या काळात गुन्हेगारीचा कळस, संजय राऊतांनी इतिहास तपासावा; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी काढले वाभाडे…
- देशाचे संविधान मोदी-शाह सरकारकडून मोडीत काढण्याचे काम, संविधान वाचले तर देश वाचेल: डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…
- नगराध्यक्षांच्या उपस्थितीत शिरळ विद्याभारती शाळेत संविधान दिन साजरा..