चिपळूण -शासनाने आदेश दिल्याप्रमाने कृषी अधिकारी ग्रामसेवक तलाठी हे भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेताच्या बांधावर धाऊन गेले व नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे पाठवण्यात आले.दिवाळी झाली तरी शेतकऱ्यांच्या पदरात भातशितीच्या नुकसानीचा एकही रुपया पडला नाही. ही दुर्दैवी व आश्चर्याची बाब आहे तसेच दिवाळी करिता ५०००/-रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत असे जाहीर करण्यात आले होते.

त्याचाही पत्ता नाही.आता कोकणातल्या शेतकऱ्यांनी करायचं काय .असा संतापजनक प्रश्न माजी सभापती व पर्यावरण प्रेमी शौकतभाई मुकादम यांनी केला आहे.व ते पुढे म्हणाले की थंडीला सुरुवात झाली तरी काही हापूस आंबा व काजू ला मोहर आला नाही ही एक चिंताजनक बाब आहे काही शेतकरी कर्ज बाजारी आहेत त्यांना कर्जाचा हप्ता भरण्यास अवधी देण्यात आली असली तरी त्यावरील व्याज वाढतच आहे.दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज माफ करावे व शेतीची नुकसान भरपाई ताबडतोब द्यावी अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.