मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.रविंद्र चव्हाण यांच्या सुचनेनुसार भाजपा रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ प्रभारी कैलास वर्मा यांनी रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ कार्यकारिणी जाहीर केली आहे. रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ प्रदेश संयोजक पदी सुकुमार पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. प्रकोष्ठ सहसंयोजकपदी सतीश कल्याणकर, अॅड.महेंद्र बुरड, श्यामसुंदर मानधना, सिद्धार्थ सिसोदे पाटील, निलेश तेंडुलकर, मिलिंद तेलंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रकोष्ठ सदस्य पदी श्रीमती सायली साठे, रविकिरण वाघमारे, नितीन परमार, राहूल दाते, सिधराम चाबुकस्वार, उमेश शाह, अनंत बोरकर, पुखराज पुरोहित, जगदीश मुर्तिकार, प्रशांत विघ्नेश्वर, मोहन शेटे, मनोहर शेलार, श्रीमती प्रतिभा ठाकूर यांची नियुक्ती तात्काळ लागू करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.