दिनांक २१ ते २३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत श्री लक्ष्य निवासी सैनिक पॅटर्न स्कूल, मणेराजुरी, गव्हाण रोड, सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धा २०२६ मध्ये नूतन विद्यामंदिर महाराष्ट्र विद्यालयाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी एकूण १५ पदकांची कमाई केली. यामध्ये ९ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.

पदक विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे :

सुवर्णपदक विजेते :

  1. उर्वी चव्हाण – सुवर्णपदक (प्राथमिक विभाग)
  2. खुशी कुळे – सुवर्णपदक (माध्यमिक विभाग)
  3. मानसी निवाते – सुवर्णपदक (माध्यमिक विभाग)
  4. लक्ष्मी सावंत – सुवर्णपदक (माध्यमिक विभाग)
  5. मोहित भोसले – सुवर्णपदक (माध्यमिक विभाग)
  6. अर्जुन कात्रट – सुवर्णपदक (माध्यमिक विभाग)
  7. स्वप्नील कात्रट – सुवर्णपदक (माध्यमिक विभाग)
  8. युवराज चव्हाण – सुवर्णपदक (माध्यमिक विभाग)
  9. श्लोक ऐवळे – सुवर्णपदक (इंग्रजी माध्यम)

रौप्यपदक विजेते :

  1. अक्षरा अहिरे – रौप्यपदक (प्राथमिक विभाग)
  2. नितीन लांबोरे – रौप्यपदक (माध्यमिक विभाग)
  3. दर्श रिकामे – रौप्यपदक (माध्यमिक विभाग)

कांस्यपदक विजेते :

  1. वेदांत धुर्ये – कांस्यपदक (प्राथमिक विभाग)
  2. दीक्षा नाईक – कांस्यपदक (माध्यमिक विभाग)
  3. श्लोक शिंदे – कांस्यपदक (इंग्रजी माध्यम)

या सर्व यशस्वी खेळाडूंचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीप सावंत, माजी अध्यक्ष श्री. नितीन सावंत, उपाध्यक्ष श्री. शशिकांत दळवी, कोषाध्यक्ष श्री. उदय जोशी, सचिव मा. श्री. अनिल देसाई सर, श्री. शंकर पटनायक सर, मुख्याध्यापक मा. श्री. मसुरकर सर, मुख्याध्यापिका मा. श्रीमती दीपाली राऊत मॅडम, प्राचार्य मा. श्रीमती पूर्वा नाईक मॅडम, प्रशिक्षक श्री. गौरव अशोक पांचाळ सर आणि सर्व पालकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.