मुंबई: प.पुज्य सदगुरू स्वामी बाळ सत्यधारी महाराज आणि मुंबई महानगरपालिका घ.क.व्य.खाते जी उत्तर विभागाच्या विद्यमाने आज दिनांक 21फेब्रुवारी 2026 रोजी सका.11.00
मुंबई स्काउट सभागृह छ.शिवाजी महाराज पार्क,दादर ,मुंबई या ठिकाणी व्यसन मुक्ती कार्यशाळेचे आयोजन केले होते.
या कार्यशाळेत पहिल्या सत्रात व्यसनापासून होणारे आजार व आजारावर कशी मात करता येईल याबाबत तपशीलवार मार्गदर्शन करण्यात आले.
डायबेटिस,कोलेस्टेरॉल, थायराॅईड,आणि रक्तदाब का होतो?हे आजार होवु नये म्हणुन काय खबरदारी घ्यावी? झाल्यानंतर हे आजार कसे रिव्हर्स करता येतील आदी बाबत उदाहरणांसहीत आजच्या कार्यशाळेत मार्गदर्शन केले गेले. आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करुन तसेच देनंदिन जीवनात उत्तम सवयी आत्मसात करुन सर्वच आजारांपासुन दुर राहता येते,तसेच झालेल्या आजारातुन मुक्त होता येते असे व्यसनमुक्ती प्रबोधनकारांनी सांगितल्यानंतर कामगारांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे दिसुन आले.
दुसर्या सत्रात या कार्यक्रमाचे मुख्य प्रवचनकार, व्यसन मुक्ती प्रबोधनकार प.पुज्य सद्गुरु स्वामी बाळ सत्यधारी महाराज हे प्रबोधन करतांना म्हणाले की व्यसनाधीन व्यक्ती ही स्वतःचे पैसे खर्च करुन व्यसन लावुन घेते अन् आयुष्य बरबादीकडे घेऊन जाते,त्यामध्ये कर्जबाजारी होणे,अनेक आजारांना निमंत्रण देणे, कामावर न जाणे,कुंटबांकडे लक्ष न देणे,एकंदरीत कुंटबांची वाताहात होणे.अन् एक दिवस त्या व्यक्तीचा अनाकलनीय मृत्यु!
कामगार वर्गाला आपली व कुटुंबाची प्रगती करायची असेल तर व्यसनापासून दुर रहा,नियमीत कामावर येणे, मिळालेल्या पगाराचे सुनियोजिन करुन मुलांच्या शिक्षणावर योग्य ठीकाणी खर्च करा, भविष्यासाठी महीना गुंतवणूक करा,(थेंबे,थेंबे तळे साचून) अन एक दिवस श्रीमंत बना.
व्यसनाधीन झालेली आणि व्यसनापासून मुक्त असणारी व्यक्तींचा तुलनात्मक वरील प्रमाणे विवेचन करुन महाराजांनी कामगारांमध्ये जनजागृती आणि प्रबोधन केले.
अशा कार्यंशाळेतुन अनेक व्यक्तींना महरांजानी व्यसनापासून कसे मुक्त केले अशांपैकी काही कामगार स्वतःउपस्थित राहून त्यांनी आपल्या स्वतःचे अनुभवांचे कथन केल्यावर उपस्थित असलेले अनेक कर्मचारीवर्ग
भाऊक झाले होते.
सर्वानी निर्व्यसनी रहा!,मस्त रहा!,आणि श्रीमंत बना! असा प्रबोधनात्मक संदेश देवुन व्यसनापासून मुक्त रहावुया अशी शपथ महाराजांनी उपस्थितीतांना दिली.
उपरोक्त कार्यक्रम घडवुन आणण्याकरिता जी उत्तर विभागाचे प्रशासकीय अधिकारी सन्मा. जाधव साहेब आणि सन्मा.ओठवणेकर साहेब
यांनी विशेष प्रयत्न केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सामाजिक कार्यकर्ते श्री.मनोहर सकपाळ, श्री.संजीव परमार यांनी मेहनत घेतली,तसेच आजच्या प्रबोधनात्मक कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्रीम.स्वाती केदारे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी समुप रत्नकांत सावंत आणि पर्यवेक्षक श्री राजेश भावसार यांची विशेष उपस्थिती लाभली.
