चिपळूण (प्रतिनिधी):– समाजाने संघटित राहिले पाहिजे. समाजाचे कार्यक्रम उपक्रमांना आपण सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे. संघटित असू तर अन्यायविरोधात संघर्ष करू शकतो. तुमच्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो, तेव्हा संघटितपणा महत्त्वाचा आहे. कार्यकर्त्यांच्या पाठीशी नव्हे तर बरोबरीने समाजाने चालले पाहिजे, असे प्रतिपादन रोहिदास पंचायत संघ, मुंबईचे माजी अध्यक्ष तथा विश्वस्त भागूराम कदम यांनी केले. भेलसई रोहिदासवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी रोहिदास समाज सेवा संघ सातगाव विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीस व संत श्री शिरोमणी रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस भागूराव कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर रोहिदास समाज सेवा संघ सातगाव विभागध्यक्ष संतोष सावर्डेकर, कार्याध्यक्ष बळीराम कराडकर, उपाध्यक्ष प्रभाकर पेवेकर, रोहिदास समाज सेवा संघ भेलसई मुंबई अध्यक्ष अरविंद कराडकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम रोहिदास समाजसेवा संघ सातगाव विभागाचे अध्यक्ष संतोष सावर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी ते पुढे म्हणाले की, संत शिरोमणी रोहिदास महाराजांनी आपल्या विचारांच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली आहे. संत शिरोमणी रोहिदास महाराजांनी समाजा- समाजात असलेली भिन्नता संपली पाहिजे. समाज एक व्हावा. एकमेकांचा आदर व्हावा, या भूमिकेतून कार्य केले. तसेच प्रामाणिकपणा, आत्मविश्वास असला की आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो, अशी शिकवण दिली आहे. तेव्हा आता समाज संघटनेचे कार्य सुरू असताना आपण सर्वांनी कार्यकर्त्यांची पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. संघटितपणाला महत्त्व आहे. तुमच्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो. कार्यकर्त्यांच्या पाठीशी नव्हे तर बरोबरीने चालले पाहिजे. संघटनेच्या कार्यक्रम उपक्रमांना अगत्यपूर्वक जा. सहभागी व्हा, असे आवाहन भागुराम कदम यांनी यावेळी केले.

यावेळी रोहिदास समाज सेवा संघ सातगाव विभागातर्फे सेवानिवृत्त शिक्षक व ज्येष्ठ समाज बांधव भिवराम कराडकर यांना जीवनगौरव पुरस्काराने भागुराम कदम यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी रोहिदास समाचार संघ सातगाव विभागाचे कार्याध्यक्ष बळीराम कराडकर, भेलसई मुंबई मंडळाचे अध्यक्ष अरविंद कराडकर यांनी आपली मनोगते मांडली. तर प्रास्ताविकात विभागध्यक्ष संतोष सावर्डेकर यांनी संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला.

यावेळी रोहिदास समाज सेवा संघ सातगाव विभागाचे उपाध्यक्ष प्रभाकर पेवेकर, खजिनदार गणेश कदम, संजीवन कदम, दत्ताराम कराडकर, प्रकाश पेवेकर, मोहन कराडकर, प्रेमनाथ पेवेकर, प्रशांत पेवेकर, सोनू पेवेकर, दिनेश आंबडसकर, संतोष पेवेकर, रोहिदास समाज सेवा संघ भेलसई -मुंबई मंडळाचे अध्यक्ष अरविंद कराडकर, सेक्रेटरी गणेश कदम, उपसेक्रेटरी सुनील कदम, खजिनदार काशीराम कदम, सल्लागार लक्ष्मण भेलसईकर, दिलीप कदम, मंगेश कराडकर, एकनाथ कदम, दिनेश कदम, राजाराम कदम, संतोष तुकाराम कदम, भेलसई रोहिदासवाडी मंडळाचे अध्यक्ष संतोष गंगाराम कदम, संजीवन कदम, ह. भ. प. राजाराम कदम, आशिष कदम, अंकुश कदम, सुजय कराडकर, श्रीकांत कदम, तुषार कदम, मारुती कदम, प्रांजल कदम, सुनील आंबडसकर, नितीन कराडकर, यश कराडकर तसेच बहुसंख्येने भगिनी देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातगाव विभागाचे सहसचिव रुपेश मासवकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहिदास समाजसेवा संघ सातगाव विभागाचे अध्यक्ष संतोष सावर्डेकर यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली.