मुंबई : गोवंडी एम – पूर्व विभागातील वाढत्या नागरी समस्यांकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वंचित बहुजन आघाडीतर्फे आज शुक्रवारी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पुनर्वसनाच्या अडचणी आणि आरोग्यविषयक तक्रारींचा वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे जन आक्रोश मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्यात आल. या ठिकाणी पोलिसांकडून मोर्चेकऱ्यांची धरपकड केली गेली , आंदोलन शांततेत होत असतानाही पोलिसांनी मारहाण केली असा आरोप होतोय.